Ad will apear here
Next
देश-विदेशांतील गणेशमूर्तींच्या दर्शनाची संधी
देवदत्त अनगळ यांच्या संग्रहातील देश-विदेशांतील गणेशमूर्तींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले. या वेळी मूर्ती पाहताना अनिल शिरोळे, देवदत्त अनगळ आदी

पुणे : सर्वांचा लाडका गणपतीबाप्पा केवळ आपल्या देशातच नव्हे, तर अन्य वेगवेगळ्या देशांतही वेगवेगळ्या रूपांत पाहायला मिळतो. देशविदेशातील त्याची नाना रूपे बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात भरलेल्या प्रदर्शनात पुणेकरांना सध्या पाहायला मिळत आहेत. भारतीय संस्कृतीचे अभ्यासक देवदत्त अनगळ यांच्या संग्रहात असलेल्या देश-विदेशांतील तब्बल ४०० गणेशमूर्ती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनाचे खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रविवार, १६ सप्टेंबर २०१८ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. 

या प्रदर्शनात आठव्या शतकापासून ते आजपर्यंतच्या मूर्तींचा समावेश आहे. तसेच भारतीय उपखंडातील कंबोडिया, नेपाळ, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, थायलंड, ब्रह्मदेश या देशांतील वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती प्रदर्शनात असून, सोने, चांदी, तांबे, पितळ, जस्त, हस्तिदंत, दगड व मातीपासून बनलेल्या दोन सेंटिमीटरपासून दोन फूट उंचीपर्यंतच्या मूर्तींचा त्यात समावेश आहे. 

त्रिशुंड गणेश, पंचमुखी गणेश, दोन हातांपासून अगदी बारा हात असणारे गणेश, वामन अवतारातील गणेश, बालगणेश, वाद्ये वाजविणारे, विविध पेहरावातील गणेश, अंगकोर या पुरातन काळातील प्रचलित असणाऱ्या नाण्यावरील, तसेच इंडोनेशियामधील चलनी नोटेवरील गणेश अशी श्री गणरायाची विविध रूपे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

देशविदेशातील गणेशमूर्तींचे प्रदर्शन :
स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर कलादालन, पुणे
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी सात या वेळेत १६ सप्टेंबर २०१८ पर्यंत. 

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPWBS
Similar Posts
पाणीपुरीच्या १० हजार पुऱ्यांपासून १० फुटी गणेशमूर्ती पुणे : गणेशोत्सवात गणपतीबाप्पाची वेगवेगळी रूपे साकारली जातात. आपली कल्पकता लढवून विविध ठिकाणी विविध साहित्यापासून गणेशमूर्ती बनविल्या जातात. अशा वेगवेगळ्या रूपांतील गणपतीबाप्पा बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पुण्यातील असेच एक आगळेवेगळे गणेशरूप पाहायला लोकांची गर्दी होत आहे. ही मूर्ती चक्क पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून बनविलेली आहे
रॉयल हाइट्स सोसायटीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प पुणे : सौरऊर्जेचे महत्त्व ओळखून, पर्यावरण रक्षणासाठी सजग असणाऱ्या बोपोडी येथील रॉयल हाइट्स को-ऑप हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी स्वत: पुढाकार घेत आपल्या सोसायटीमध्ये ३२ किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे आणि महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे ‘अपसाउथ’मध्ये प्रदर्शन पुणे : पाण्यात सहजपणे विरघळणाऱ्या माती, तुरटी, गायीचे शेण, पंचगव्य यापासून बनलेल्या; कोणताही रंग न दिलेल्या निव्वळ मातीच्या, तसेच नैसर्गिक रंगांमध्ये रंगवलेल्या आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे प्रदर्शन वाकड येथील अपसाउथ हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
वाहतुकीच्या खेळखंडोबातून मार्ग काढणारा बाप्पा.. गणेशोत्सवात अनेकजण नागरिकांचे मंनोरंजन करत असतानाच आपल्या देखाव्यातून काही सामाजिक संदेश देता येईल का, याचाही पूरेपूर विचार करून त्या पद्धतीची आरास करत असतात. पुण्यातील पर्वती परिसरात राहणारे रत्नाकर जोशी यांनी आपल्या घरात पुणे शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा यावर आधारित प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language